Jul 102011
 
साहित्य :-
आर्धी जुडी पालक
पुदिना
कोथिंबीर
हिरवी मिरची
२ चमचे लिंबाचा रस
कणिक
बेसन
चवीनुसार मीठ
कृती:-
१.पालक धुवून वाफवून घ्यावा.
२.पुदिना,पालक,कोथिंबीर,मिरची एकत्र वाटून घ्यावेत.
३.त्यात लिंबाचा रस मिसळावा.
४.या सारणात मावेल तेवढे कणिक व थोडे बेसन  टाकून पीठ घट्ट भिजवून घ्यावे.
५.छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तेलात खरपूस तळून घ्यावेत.
६.दह्या बरोबर खाण्यास द्यावे.
 

 Posted by at 12:50 pm